Very happy to share with you that Times of India and New India insurance have jointly selected our organisation Maharogi Sewa Samiti: Anandwan Project as 'Best Healthcare Initiative for Social Good' for the dedication, knowledge and contribution to the Healthcare Sector in the 1st edition of the ‘Healthcare Achievers Awards 2014’. The award will be presented on 11th December, at New Delhi. This is a great tribute to Baba Amte in his Centenary year.
Sunday, November 23, 2014
Dr. Vikas Baba Amte
Very happy to share with you that Times of India and New India insurance have jointly selected our organisation Maharogi Sewa Samiti: Anandwan Project as 'Best Healthcare Initiative for Social Good' for the dedication, knowledge and contribution to the Healthcare Sector in the 1st edition of the ‘Healthcare Achievers Awards 2014’. The award will be presented on 11th December, at New Delhi. This is a great tribute to Baba Amte in his Centenary year.
Monday, June 9, 2014
बाबांचा वसा पुढे चालवतोय… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भावना
बाबांचा वसा पुढे चालवतोय…
Jun 9, 2014, 03.59AM ISTज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भावना
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'न सांगितलेल्या, पण अनुभवलेल्या संस्कारात वाढलो. वाट खडतर असतानाही बाबांचा वसा पुढे चालवतोय,' अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.
तळेगाव दाभाडे येथील फलके एफएमसीजी कंपनीच्या 'संपूर्ण सिद्धी' उत्पादनाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त डॉ. आमटे यांचा कार्यगौरव आणि प्रकट मुलाखतीचे आयोजन कासारवाडीतील हॉटेल कलासागरमध्ये नुकतेच करण्यात आले होते. त्या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तळेगावचे नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, देवराईचे संस्थेचे संस्थापक सुकनशेठ बाफना, अध्यक्ष गिरीष खैर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र फलके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश फलके या वेळी उपस्थित होते. लोक बिरादरी प्रकल्पासाठी एक लाख रुपयांची देणगी या वेळी देण्यात आली.
डॉ. आमटे म्हणाले, 'बाबा जे बोलत ते करून दाखवत. कोणी न सांगितलेल्या परंतु प्रत्यक्ष अनुभवलेल्या संस्कारातूनच विकास आणि मी दोघेही वाढलो. मजुरांच्याच शाळेत शिकलो. बाबांमुळे खूप मोठे व्यक्ती दुरून का होईना अनुभवता आल्या. वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यावर बाबांनी भाभ्रागड येथील आदिवासी गावांमध्ये फिरवले. तेव्हाच तिथे काम करायचे असल्याचे सांगितले. वाट खडतर असतानाही बाबांचा वसा पुढे चालवण्यासाठी एका झोपडीतून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला दूर पळणाऱ्या माणसांना विश्वास दिला. तेव्हा ते जवळ येवून उपचारासाठी आमच्याकड़े येवू लागले.'
ते म्हणाले, 'पडक्या झोपडीत राहून आदिवासी लोकांच्या जखमा पुसल्या. त्या जखमा धुण्यातही एक आनंद होता. जखम बरी झाल्यावर व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान मिळायचे. मायेने जवळ केलेल्या जंगली प्राण्यांनाही प्रेमाची भाषा समजते, हे सिद्ध करता आले. म्हणूनच, मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्या खूप जवळ पोहचता आलं, हे आपलं भाग्य आहे.'
मंदाताई यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या प्रवासातील प्रकाश आमटे यांच्याशी असलेली जवळीक, आनंदवनात झालेला प्रेमविवाह, माहेरच्या नातेवाईकांचा तुटलेला संपर्क आणि हेमलकसा जंगलातील प्रवास उपस्थितांना उलगडून सांगितला.
'प्राण्यांनाही समजते प्रेमाची भाषा'
'मी त्यांच्याशी आयुष्यभर साथ देण्याचा वसा तेव्हाच घेतला होता. तोच वसा आजही आमच्या सुना तितक्याच जोमाने चालवतात. एका माकडाच्या पिल्लापासून घरी प्राणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर मायेने जवळ केलेल्या जंगली प्राण्यानांही प्रेमाची भाषा चांगली समजते, हे जगाला सिद्ध करून दाखवता आले. आमच्याबरोबर माकड, वाघ, कुत्रा आणि हरीण जेव्हा नदीवर फिरायचे, तेव्हा ते टिपायला एखादा छायाचित्रकार असायला हवा होता,' अशी भावना मंदा आमटे यांनी या वेळी व्यक्त केली.
Sunday, June 8, 2014
मुक्काम पोस्ट हेमलकसा
Following article was published in DIVYABHARATI
मुक्काम पोस्ट हेमलकसा
समीक्षा आमटे | Jun 06, 2014, 05:52AM IST
बाबा आमटे हे खरे तर तुमच्या-आमच्यासारख्याच साध्या घरातून आलेले एक
सर्वसामान्य तरुण.
त्यांच्या नशिबाने आयुष्यात आलेले कलाटणीचे प्रसंग त्यांनी हेरले आणि परिस्थितीचे सोने केले. ते एका सधन कुटुंबातले आणि शौक करणारेच होते. आपण सगळेच झोपेतून उठल्यावर सुरुवातीला आळशी असतो, तसेच हे पूर्वायुष्य म्हणता येईल. झोपेतून उठल्यावरचा अर्धाच तास. पण नंतर आपल्याला बरेच चांगलेवाईट अनुभव येत जातात, त्या अनुभवांचे आपण काय करतो हे आपल्यावर असते. मला वाटते, प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी कलाटणी केव्हा ना केव्हा येत असते. नेमक्या त्या वळणावर आपले निर्णय आणि धाडस आपल्याला सामान्यच ठेवतात किंवा असामान्य बनवतात.
त्यांच्या नशिबाने आयुष्यात आलेले कलाटणीचे प्रसंग त्यांनी हेरले आणि परिस्थितीचे सोने केले. ते एका सधन कुटुंबातले आणि शौक करणारेच होते. आपण सगळेच झोपेतून उठल्यावर सुरुवातीला आळशी असतो, तसेच हे पूर्वायुष्य म्हणता येईल. झोपेतून उठल्यावरचा अर्धाच तास. पण नंतर आपल्याला बरेच चांगलेवाईट अनुभव येत जातात, त्या अनुभवांचे आपण काय करतो हे आपल्यावर असते. मला वाटते, प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी कलाटणी केव्हा ना केव्हा येत असते. नेमक्या त्या वळणावर आपले निर्णय आणि धाडस आपल्याला सामान्यच ठेवतात किंवा असामान्य बनवतात.
लोकबिरादरी प्रकल्पाचे सगळेच कार्यकर्ते असेच सामान्य, साध्या घरातून आलेले पण वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांनी दाखवलेला समंजसपणा, धैर्य त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. हाच गुण प्रत्येक भव्य व मोठ्या कामाचा गाभा असावा. कारण वेगळ्या आणि अवघड वळणांची भीती तर प्रत्येकाला वाटत असते. मी कशालाच घाबरत नाही, हे म्हणजे धाडस नाही, त्यापलीकडे काहीतरी आहे, जे आपल्याला मिळवायचे हे ज्यांना कळते तेच सकाळचा आळस झटकू शकतात.
1970मध्ये एक कुटुंब भामरागडच्या दाट जंगलात सहलीला गेले होते. निसर्गरम्य परिसर, संथ वाहणार्या नद्यांचे त्रिवेणी संगम, वन्य प्राणी, या सगळ्याचा आनंद घेताना त्यांना दिसली तिथली विलक्षण माणसे, आरोग्य आणि शिक्षणाचा गंध नसलेली. त्या कुटुंबप्रमुखाने ठरवले, की इथेच या माणसांसाठी काम करायचे. त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना सामील होण्याचे वचन दिले. या कलाटणीच्या क्षणी, एमबीबीएस शिकणार्या एका विद्यार्थ्याचे मॅगसेसे विजेते डॉ. प्रकाश आमटे यांच्यात रूपांतर झाले. तसेच प्रेमाखातर नवर्याबरोबर कुठेही, कसेही राहायची तयारी असणारी एक मध्यमवर्गीय डॉक्टर तरुणी असामान्य झाली. हीच कहाणी रेणुका व विलास मनोहर, गोपाळ फडणीस व प्रकल्पातल्या प्रत्येकाचीच आहे.
प्रकल्पाची सुरुवात 1973 साली झाली. कार्यकर्ते इथे झाले, हे काम एकट्याचे नाही, ही एक प्रचंड मोठी पार्टनर्सची, भागीदारांची, साथीदारांची यशस्वी साखळी आहे. या साखळीतले सगळे लोक नेमून दिलेले काम उत्तम तर करतातच; पण गैरहजर, नादुरुस्त साखळ्यांचा भारसुद्धा आनंदाने आणि समर्थपणे उचलतात.
या प्रकल्पात आज एक सुसज्ज दवाखाना आहे, ज्याला लवकरच एक भव्य अत्याधुनिक वास्तू मिळणार आहे. दवाखान्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. अनघा व डॉ. दिगंत सांभाळतात. माडिया व इतर आदिवासी जमातींसाठी एक शाळा आहे, ज्याचं काम मी व माझा नवरा अनिकेत पाहतो. वन्य प्राण्यांचे अनाथालय आहे. याचबरोबर बांबू हस्तकला, डेअरी व कुक्कुटपालन प्रकल्पदेखील आहेत, ज्या सगळ्याचा भार अनिकेतवरच आहे. आम्हाला या सगळ्या कामात तरुण, कष्टाळू व प्रचंड प्रेमळ कार्यकर्ते मिळाले हे आमचे भाग्य. प्रकल्पाच्या 33 एकर जमिनीवरच शाळा, दवाखाना, प्राणी अनाथालय, तीन मोठी वसतिगृहे व इतर प्रकल्प अहेत. तसेच आम्ही सर्व कार्यकर्ते व इतर मंडळींची घरेसुद्धा याच वास्तूत आहेत. सर्व अर्थांनी आम्हा सगळ्यांचा मुक्काम व पोस्ट एकच आहे.
आता वेगळा निर्णय तर घेतलाय, पण पुढचा मार्ग दाखवायला बाबांची शिकवण व वागणुकीचा आदर्श होता. त्यांची एक शिकवण म्हणजे एकत्र जीवन आणि एकत्र जेवण. प्रकल्पात आम्ही सहजीवन तर अनुभवतोच, पण त्याबरोबर जेवणही एकत्र रसोड्यात असतं.
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही सण साजरे करतो. तसेच आमच्याकडे काम
आणि सामाजिक जीवन तसे जवळजवळ एकच आहे म्हणा ना. बाकीच्या जगापासून लांब
असल्याने, आहेत त्याच व्यक्तींमध्ये काका/मामा/मावशी अशी नाती शोधत-जोडत
इथले कार्यकर्ते आनंदाने राहातात. पण भांडणं, वादविवाद तर होतच राहतात, या
नैसर्गिक मनुष्यप्रकृतीला हेमलकसा कसा अपवाद ठरेल? कोणाची बाजू घ्यायची वेळ
आली तर काय करावे? तेव्हा सासर्यांच्या वागण्याचा आदर्श आम्ही पाळतो.
लगेच प्रतिक्रिया नाही द्यायची, दोन दिवसांनी आपल्या लक्षात येते की
क्षुल्लक कारण होते. आणि मग मोकळ्या मनाने ते विसरून आपल्या माणसाला जवळ
करायचे.
बाबांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की इथे आल्यावर कुष्ठरोगी काम करतात, परिश्रम करून सन्मानाने राहतात तेव्हा समाधान तर वाटतंच; पण त्याहीपलीकडे जाऊन जेव्हा ते दुकानात जाऊन स्नो, पावडर विकत घेतात तेव्हा जास्त आनंद होतो. म्हणजे ते जीवनाच्या प्रेमात पडतायत, असे आम्ही समजतो. मानाने तर जगतातच, पण जगण्यावर प्रेम करत जगताना पाहून बाबांना कामाची पावती मिळते.
तर सांगायचे हे, की हा एवढा मोठा व्याप ही एक सुंदर आणि निर्भेळ पार्टनरशिपच आहे. परस्परांशी कोणतेही नाते नसलेल्या शेकडो - हजारो लोकांची. ज्यात प्रकल्पासाठी राबणारे कार्यकर्ते तर आहेतच, पण अनेक शुभचिंतक आणि स्नेहीही आहेत. ही मन-भावनांची साखळी अशीच अखंड राहो, हीच प्रार्थना. यामध्ये असे कैक अज्ञात लोक आहेत ज्यांनी भरीव मदत केली आहे. आमच्या शाळेची मुले जेव्हा पुणे किंवा मुंबई अशा मोठ्या शहरांत येतात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यावर उत्तर ही माणसे शोधतात. कालच एक मुलगी सांगत होती, की तिच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी तिच्या दुपारच्या डब्याची खास सोय केली. रसायनशास्त्राचे शिक्षक इतक्या पोटतिडकीने शिकवतात, की तिने पैकीच्या पैकी मार्क मिळवले. अशी कितीतरी उदाहरणे, कधीही या लोकांची माझी भेट नाही. वाटते कसे यांना सांगावे की त्यांच्या छोट्याशा कृतीने त्या चिमुकलीचे आयुष्य बदललेय, पण thank you सारख्या शब्दांनी त्या भावना पोचणार नाहीत किंवा त्या गढूळ होतील अशीही भीती वाटते. म्हणून त्यांचे भले व्हावे, हीच मनोकामना. अशी अज्ञात मंडळी हे आमच्या साखळीतले वंगण आहे, जे दिसत नाही पण खूप मोलाचे आहे. आज त्या सगळ्या अज्ञातांना आदराचा सलाम!
समीक्षा आमटे
sam.aqua18@gmail.com
Sunday, May 11, 2014
Friday, May 9, 2014
Monday, May 5, 2014
Monday, April 28, 2014
Pradarshan of LOK BIRADARI PRAKLAPA in DOMBIVLI
Lok Biradari Prakalpa is arranging a Pradarshan of Lok
Biradari Prakalpa @ BALBHAVAN , RAMNAGAR , CHIPLUNKAR PATH , DOMBIVLI ( E ) ,
Dates : 28th April till 2nd May, 2014 . Time : 10.00 am
till 9.00 pm. Donation for Reconstruction of Hospital at Lok Biradari Prakapla
will be accepted in the exhibition.
Do visit. Inform others about this.
Saturday, April 5, 2014
AMTE FAMILY.
Other things may change us, but we start and end with family. In today’s highly competitive, modern & fast paced life, Amte family is like a lighthouse for aspiring youngsters; who seriously want to contribute towards under privileged section of the society & eventually humanity. Amte Family is a perfect Example of an Ideal Family.
Monday, March 31, 2014
Vyakhyan from Dr. Bharati Amte in Thane
AN APPEAL FOR HOSPITAL PROJECT AT LOK BIRADARI PRAKALPA
AN APPEAL FOR HOSPITAL PROJECT AT LOK BIRADARI PRAKALPA
AN APPEAL FOR HOSPITAL PROJECT AT LOK BIRADARI PRAKALPA The Lok Biradri Prakalp (LBP) Cottage Hospital was started in 1973 by Dr. Prakash and Dr. Mandakini Amte in Hemalkasa, a remote village in Bhamragad taluka of Gadchiroli district, Maharashtra. What started as a hospital in a small hut is now a well-equipped 30-bed hospital, which has worked ceaselessly to provide modern healthcare facilities to the Madia-Gond tribals of the region for over 30 years. Annually around 40,000 OPD and 1,500 IPD cases are seen at the hospital, and around 400 minor surgeries performed. With no penetration of private healthcare in the taluka, the government healthcare machinery on its own will be inadequate to absorb all health cases arising in the region. Thus the need for LBP cottage hospital to continue providing quality medical care to the impoverished tribals today is as relevant as it was in 1973. If we calculate the value of medical services provided by the LBP hospital by comparing it to the closest private set up, annually treatment worth Rs. 52.5 lacs is passed on to society free of cost. In the past few years, a strong need has been felt to expand the medical facilities available at the hospital by its reconstruction into a modern complex. This need arises due to problem areas in the existing hospital complex, and also for satisfying the increasing medical needs of the Madia-Gonds. The LBP cottage hospital is currently operating out of a structure that was built in 1978. Due to limited funds at the time there was extensive use of mud and wood in the construction. Thus the hospital building today faces a major termite problem and the wooden beams will not support the structure for many more years. The construction of the building was also kept very simplistic due to lack of professional architectural inputs at the time. Thus the layout isn’t designed specifically to suit hospital operations. This leads to a lack of synergy in the operations of the LBP cottage hospital. With increasing number of cases being handled by the hospital there is also a need for capacity expansion- a larger IPD section, more delivery tables, an ICU room, a larger NICU facility, and new blood storage facilities. There is also a need to increase the number of operation theatres to handle increasing number of surgeries. The reconstruction project is further justified due to the dedication of the implementing organization to ensure not just successful project completion, but also their resolve to run this hospital for decades to come. Dr. Digant and Dr. Anagha Amte (son and daughter-in-law of Dr. Prakash and Dr. Mandakini Amte) took over operations of the hospital in 2003. The third Amte generation to dedicate their lives to a social cause, they have taken a vow to continue their medical practice at Hemalkasa their entire career. They are joined by many young volunteers.Thus the aim of this project is to “reconstruct the LBP cottage hospital and increase its capacity from 30 to 40 beds, to ensure that the Madia-Gonds of this region continue to receive modern healthcare services for the years to come” The layout for a new hospital complex has been designed to suit the unique needs of the LBP cottage hospital. Based on this design, the total budget of the project inclusive of the construction and equipment cost is approximately 5.4 crores. Details of the fund status are as follows- Estimated cost in Rs. Funds received through grants Deficit in funds Phase 1. Hospital building 4,85,00,000.00 4,19,00,00.00 66,00,000.00 Central water storage and supply system 45,00,000.00 45,00,000.00 Phase 2. Residential quarters for staff 2,50,00,000.00 2,50,000.00 There is a deficit of Rs. 1,11,00,000.00 for the phase 1 of the hospital project and of Rs.25000000 For phase 2 of the hospital project. The donations should be in the name of ‘Maharogi Sewa Samiti, Warora’. The donors should write their full name, complete address, phone number and PAN with the cheque. On-line transfers can be made to A/c no.20244238823 of Bank of Maharashtra, Bhamragad Branch, Gadchiroli, IFSC MAHB0001108. After transferring the amount donors are requested to inform Mr. Ketan Phadnis (mob. No. 7588772857) about fund transfer and details like full name, complete address, mobile number and PAN. Please note that receipt of contribution will be dispatched to the given address within a month. The donors will receive income tax exemption under 80 G.
Sunday, March 30, 2014
Article Published in Maharashtra Times ठाणे + कोकण Mar 31, 2014, 12.45AM IST आनंदवनसाठी ठाणेकरांची मदतीची गुढी म. टा. वृत्तसेवा, ठाणे बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कुष्ठरोगी आणि आदिवासींसाठी निर्माण केलेल्या आनंदवनाची आणि त्यांच्या कार्याची ठाणेकरांना ओळख व्हावी या उद्देशाने ठाण्यातील आनंदवनस्नेही मंडळ कार्यरत आहे. आमटे परिवाराच्या या उज्ज्वल कार्यासाठी ठाणेकरांनीही मदतीचा हात पुढे केला असून, दहा वर्षांत ठाणेकरांनी आनंदवनसाठी ८१ लाखांची मदतरुपी गुढी उभारली आहे. आनंदवन, लोकबिरादरी, हेमलकसा, सोमनाथ अशा १५ - १६ प्रकल्पांच्या माध्यमातून आज आमटेंची तिसरी पिढी कार्य करत आहे. बाबा आमटे यांनी घेतलेला समाजकार्याचा हा वसा जपण्याची जबाबदारी केवळ आमटे कुटुंबीयांची नाही तर ती माणुसकी जपणाऱ्या प्रत्येकाची आहे. या उद्दात्त भावनेने २००३ मध्ये भाऊ नानिवडेकर, सत्यजीत आणि गीता शहा, रंजना कुलकर्णी, स्वाती आगटे, शरद भाटे यांनी आनंदवन स्नेही मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी फूल ना फुलाची पाकळी म्हणून ठाणेकर या प्रकल्पांसाठी मदत देत आहेत. आनंदवनातल्या मुलांनी, अपंगांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांची विक्री, आनंदवनावर आधारीत पुस्तकांची विक्री करणे, आमटे कुटुंबीयांची व्याख्याने आयोजित करून निधी गोळा करण्यासाठी आनंदवन स्नेही मंडळाचे १०० कार्यकर्ते धडपडत असतो, असे सत्यजीत शहा यांनी सांगितले. २००९- १० मध्ये ६ लाख ६३ हजार ५७४, २०१०- ११ मध्ये १३ लाख २१ हजार ५७६, २०११- १२ मध्ये ३२ लाख ९२ लाख ८१३, २०१२- १३ मध्ये ५ लाख३२ हजार ८६० आणि २०१३ पासून आतापर्यंत ९ लाख ७३ हजार ८२८ रूपयांची मदत ठाणेकरांनी आनंदवन स्नेही मंडळाच्या माध्यमातून आनंदवन व लोकबिरादरी प्रकल्पासाठी केली आहे. हवेत मदतीचे हात आनंदवन स्नेही मंडळाने लोकबिरादरी आणि आनंदवन प्रकल्पांची माहिती देण्यासाठी http://anandwansnehimandalthane.blogspot.in/ ही वेबसाइटही सुरू केली आहे. लोकबिरादरी प्रकल्पात सध्या हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी ठाणेकरांकडून ५ लाखांची मदत देण्याचे आश्वासन मंडळाने दिले आहे. यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे, ज्यांना शक्य असेल, त्यांनी सत्यजीत शहा यांना ९८२११५०८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.
Subscribe to:
Posts (Atom)