समाजातल्या चांगुलपणावर विश्वास
11 Jan 2010, 0115 hrs IST
- म. टा. प्रतिनिधी
'समाजातल्या चांगुलपणावर आमचा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या आधारावरच हेमलकसाचं काम समाजात उभं राहील'... ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांचे हे उद्गार ऐकून प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. बोरिवलीत सुरू असलेल्या 'शब्द गप्पां'मध्ये मंगळवारी डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. आमटे दाम्पत्याचा जीवनप्रवास ऐकायला यावेळी बोरिवलीकरांची प्रचंड गदीर् उसळली होती.
आमटे दाम्पत्याच्या गप्पांमध्ये आनंदवन ते भामरागड व्हाया हेमलकसा हा प्रवास मांडला. बाबा आमटे यांनी दिलेली प्रेरणा, पुढच्या पिढीवर त्यांनी केलेले संस्कार, प्रकाश आणि विकास आमटे यांचे बालपण याविषयी प्रकाश यांनी मोकळेपणाने सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी या दाम्पत्याला बोलते केेले. भामरागड लोकबिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेमागचा रोचक इतिहास सांगताना आमटे म्हणाले, 'बाबांनी आम्हाला तेथे पिकनिकला म्हणून नेलं आणि दोन दिवस आम्ही तेथील सगळी आदिवासी गावं फिरलो. तेथील जीवन पाहून मी अस्वस्थ झालो. या लोकांसाठी काम करण्याचा मनसुबा बाबांनी व्यक्त करताच मी त्यांच्यासोबत येण्याचं कबूल केलं.' डॉ. मंदा आमटे यांनी प्रकाश यांना दिलेली साथ आणि मंदाताईंना आदिवासी भागात काम करताना आलेलेे अनुभव ऐकताना प्रेक्षक हेलावून गेेले. आमच्या कामाला लोकमान्यता मिळत असून त्यातून आमचा हुरूप वाढत असल्याची भावना आमटे दाम्पत्याने व्यक्त केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment