Showing posts with label Problem of DROUGHT in ANANDWAN. Show all posts
Showing posts with label Problem of DROUGHT in ANANDWAN. Show all posts

Sunday, December 20, 2009

News about problem of DROUGHT in ANANDWAN

Following news was appeared in Maharashtra Times dt. 21st Dec. 2009.

We all should try our level best to help ANANDWAN.

नागपूर + विदर्भ

आनंदवनावर दुष्काळाचे संकट
21 Dec 2009, 0049 hrs IST


- रवींद जुनारकर/पंकज मोहरीर , चंदपूर


अपुऱ्या पावसामुळे आनंदवनावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, प्रचंड आथिर्क अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरड्या दुष्काळाला सामोऱ्या जाणाऱ्या राज्यातील इतर शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी दीडशे कुष्ठरोगी, अंध व अपंगांना सोबत घेऊन डॉ. विकास आमटे यांनी 'भारत जोडो स्वरानंदनवन अभियान' सुरू केले आहे. या अंतर्गत डॉ. आमटे महाराष्ट्रभर फिरून लोकशिक्षणाचे प्रयोग सादर करणार आहेत.

आनंदवनाच्या स्थापनेला यंदा साठ वषेर् पूर्ण होत असून, या काळात आनंदवनाला पहिल्यांदाच कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. येथे शेतीतून कोट्यवधीचे उत्पन्न घेतले जाते.

आनंदवनात १३० एकरवर सुमारे ८०० क्विंटल सोयाबीन पीक घेतले जाते. मात्र, यंदा पिकावर उंट अर्काचा प्रादुर्भाव झाल्याने केवळ ६० क्विंटल उत्पन्न झाले. तसेच, सोमनाथ प्रकल्पात दरवषीर् अडीच हजार क्विंटल इतके तांदळाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा तांदळाचे उत्पादनच होऊ शकलेले नसल्याची माहिती कौस्तुभ आमटे यांनी दिली.

येथील बोअरवेल आटल्याने रबी हंगामात ३०० एकरऐवजी १० एकरवरच यंदा उत्पादन घेतले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. शेतीच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने आनंदवनाला यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे आमटे यांनी सांगितले. तसेच, येथे खासगीरित्या शेती होत असल्याने सरकारी पॅकेजचाही फायदा मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही परिस्थिती राज्यभर असून, दोन वर्षांपासून शेतीचे वास्तव भयंकर आहे. शेतकऱ्यांची वाईट अवस्था लक्षात घेता आनंदवनचे संचालक डॉ. विकास आमटे यांनी हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वरानंदनाचे वीस कार्यक्रम होणार असून, १५ जानेवारीला मराठवाड्यात समारोप होणार असल्याची माहितीही कौस्तुभ आमटे यांनी दिली.