Thursday, November 5, 2009

Photos of Meeting of ASM,Thane on 25th Oct. 2009

These are photos of monthly meeting of ASM,Thane on 25th Oct. 2009.

Speciality of the meeting was this was conducted in the absence of our BHAU NANIVADEKAR.

BHAU has expressed graet satisfaction on the successful managing monthly meeting in his absence.



Stall of ASM, Thane at Vashi

Karyakrtas of ASM, Thane who made this event a grand success with Dr. Prakash Amte & Dr. Mrs. Mandatai Amte.

Photos of ASM, Thane stall at VASHI

Our Bhau Nanivadekar in detailed discussions with Dr. Prakash Amte & Mandatai about developements at ASM, Thane.


A visitor in the stall with Dr. Prakash Amte for his AUTOGRAPH

Stall of ASM,Thane @ VASHI

Welcome of Dr. Prakash AMte & Dr. Mrs. Mandakini Amte to Stall of ASM, Thane


Visit of Dr. Prakash AMte & Dr. Mrs. Mandakini Amte to Stall of ASM, Thane




Sunday, November 1, 2009

An article published in "LOKSATAA" dt. 1st Nov. 2009

"LOKSATAA"

01 November 2009
वर्षांनुवर्षे होणाऱ्या अन्यायापासून नक्षलवादाचा उगम - प्रकाश आमटे
नवी मुंबई, २१ ऑक्टोबर /प्रतिनीधी
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज कित्येक वर्ष लोटली तरीही गरीबाला आजही तितकासा न्याय मिळत नाही, अशी परिस्थीती आहे. निवडणुकांमध्ये काही कोटींच्या घरात पैशाचे वाटप होत असताना देशातील एक मोठा वर्ग आजही स्वतवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून जगत आहे. अशातून काहींचा संयम सुटतो आणि मग बंदूका हाती घेतल्या जातात. नक्षलवाद हा उपजत नसून वर्षांनुवर्षे होणाऱ्या अन्यायातून त्याचा उगम होत असल्याचे सर्वानीच लक्षात घेण्याची गरज असून देशातील खेडोपाडय़ांमध्ये, दुर्गम भागांमध्ये वसलेल्या आदिवासींना न्याय देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारल्याशिवाय काही प्रश्नांची सोडवणुक होणे कठीण आहे, असे स्पष्ट मत मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी आज वाशी येथे व्यक्त केले. हे मत व्यक्त करतानाच हिंसेने प्रश्न सुटतात यावर आपला अजिबात विश्वास नाही, तसेच तो आमचा मार्गही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माणूस नावाच्या प्राण्यापर्यंत ईश्वराचा हात पोहचविण्याचे विलक्षण आणि तितकेच अतुलनिय काम केल्यानंतरही अत्यंत समर्पित तरीही साधेसुधे असे आयुष्य जगलेले डॉ.प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत आज वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली. नवी मुंबई मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ तसेच नवी मुंबई सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. भामरगड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पापासून या भागातील आदिवासी, वन्य जीवांमध्ये समर्पित आयुष्य जगलेल्या आमटे दांम्पत्यांच्या आयुष्याचे एकएक पदर या मुलाखतीद्वारे गाडगीळ यांनी नवी मुंबईकरांपुढे उलगडून दाखविला. कधी-कधी मनाला चटका देणारे, तर कधी रोमहर्षक अशा प्रसंगांची माळ गुंफत तब्बल दीड तासांहून अधिक काळ रंगलेल्या या मुलाखती दरम्यान डॉ.आमटे यांनी रकाही सामाजिक प्रश्नांविषयी देखील आपली मते अगदी ठोसपणे मांडली. आम्ही जेव्हा भामगड तालुक्यात काम सुरु केले तेव्हा या भागात नक्षलवादी नव्हते. तब्बल १० वर्षांनी ते आले. आमचा मुळात हिंसेवर विश्वास नाही. मात्र, तरीही नक्षलवादी हा उपजत नाही, असे स्पष्ट मत डॉ.आमटे यांनी यावेळी मांडले. एखाद्या वर्गावर वर्षांनुवर्षे होणाऱ्या अन्यायातून काही गोष्टींचा उद्रेक होत असताना आता दुखण्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता असून आदिवासींच्या विकासासाठी ठोस यंत्रणा येत्या काळात राबवावी लागले, असे मत डॉ.आमटे यांनी यावेळी व्यक्त केले. आदिवासी ही मुळातच सोशीक जमात. तिथे व्यंगाला मान आहे. आज शहरांमध्ये रस्त्यांरस्त्यांवर भिकाऱ्यांची रांग दिसत असताना आदिवासी उपाशी रहातील पण भीक मागणार नाहीत. काहीही झाले तरी चोरी करावी, असा विचार त्यांच्या मनाला कधीच शिवणार नाही. आदीवासींचे हे गुण आज सर्वानीच आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या भोगवादी जगात आपण आपल्याहून वर असणाऱ्याकडे काय आहे ते पहात रहातो, पण आपल्यापेक्षा खाली असलेल्यांचा विचार आपल्या मनाला शिवतही नाही, असे डॉ.आमटे यावेळी म्हणाले. मी किंवा मंदाकिनी दोघांनीही कोणत्याही पुरस्कारासाठी कधीही काम केले नाही. परंतु, पुरस्काराच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचले आणि त्यांच्या रहाणीमानावर प्रकाश पडला, याचे आम्हाला अधिक समाधान आहे, असे ते म्हणाले. यावेळी आयोजकांतर्फे डॉ.आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास सव्वा तीन लाखांची देणगी देण्यात आली.
सरकारचे अज्ञान
लोकबिरादरी प्रकल्पाची दखल घेत तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला त्या प्रकल्पाला आतापर्यंत कोणत्या पंतप्रधानांनी भेट दिली आहे का, या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर आमटे यांनी तसा योगच आला नाही, असे उत्तर दिले. मला पुरस्कार मिळाला आणि राज्य सरकारने अभिनंदनाचा ठराव करुन एक पत्र मला पाठविले. त्यामध्ये तुम्ही कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कामाबद्दल मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुमचे अभिनंदन, असा मजकूर होता. हा मजकूर पाहून मला हसूच आले, असा किस्साही त्यांनी या प्रश्नादरम्यान सर्वाना ऐकविला.

An article published in "LOKMAT" dt. 1st Nov. 2009